Design संकल्पचित्र – नक्षीकाम

Design  संकल्पचित्र नक्षीकाम  

 परीक्षेच्या वेळापत्रकानुसार हा तिसरा पपेर असतो. एलिमेंटरी परीक्षेसाठी २.३० तास तर इंटरमिजीएट परीक्षेसाठी ३.०० तास वेळ या पेपरसाठी देण्यात येतो.  

         एलिमेंटरी परीक्षेसाठी संकल्पचित्र हे चौकोन, वर्तुळ, अर्धवर्तुळ, आयात, त्रिकोण, पंचकोन, षटकोन अशा बाह्य आकारामध्ये भौमितिक नैसर्गिक  आकारांच्या आधारे संकल्प रचना नक्षीकाम करायची असते. यासाठी प्रश्न पत्रिकेत दिल्याप्रमाणे घटकांचा उपयोग करून आच्छादित पद्धतीने रचना करावी. यासाठी उपयोगात येणारे घटक उदा. चौकोन, वर्तुळ, आयात, त्रिकोण, सरळ, वक्र  किंवा लयदार रेषा, पाने फुले, माशांचे नैसर्गिकभौमेतिक किंवा अलंकारीक आकारांचा कल्पकतेने उपयोग करून सुरेख विभाजन आरेखन करावे. विभाजन करतांना जास्त छोटे किंवा जास्त लहान आकार तयार होणार नाहीत याकडे लक्ष द्यावे. जेणेकरून रंगवतांना आपल्यास समस्या येणार नाही. तुम्ही  संकल्पासाठी समअंग किंवा विषमअंग संकल्परचना करू शकतात.

         समअंग रचना                                       विषमअंग रचना 





          त्याचप्रमाणे इंटरमीजिएटसाठी एखाद्या विशिष्ट घटकाच्या सुशोभनासाठी दिलेल्या बाह्य आकारामध्ये संकल्परचना नक्षीकाम करायचे असते. उदा. ( हॅट, शूज टाईल्स, साडी बोर्डर, पर्स, टेबल लम्प, फुलदाणी, कपबशी )  यामध्ये विविध प्रकारच्या रेषा, भौमेतिक आकार, पाने, फुले, डहाळी, पक्षी, फुलपाखरे, मासे, प्राणी. नैसर्गिक, अलंकारीक, अमूर्त आकारांचा उपयोग संकल्पासाठी  नक्षीकामासाठी करायचा असतो. दिलेल्याबाह्य आकारानुसार अनुरूप अशी समअंग किंवा विषमअंग पद्धतीने तुमच्या आवडीनुसार संकल्प रचना करू शकतात. संकल्प रचनेला अनुरूप सुयोग्य रंगसंगतीचा वापर केल्यास चित्र सुरेख होते. त्याच बरोबर चित्र रंगवतांना काटेकोरपणा साफाईदारपणा याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे.    


        दोघ परीक्षांसाठी संकल्पचित्र व नक्षीकामासाठी योग्य रंगसंगती घेऊन त्या रंगांच्या गडद, उजळ छटांचा उपयोग करून आकर्षक पद्धतीने चित्र पूर्ण करावे. रंगसंतीसाठी एकरंगसंगती, विरोधी रंगसंगती, त्रिरंग रंगसंगती, उष्ण किंवा शीत रंगसंगती अशा रंगसंगतीचा उपयोग तुम्ही करू शकतात. त्याचप्रमाणे तुम्ही बनवलेल्या नक्षीकामानुसार तुमच्या आवडीने रंगछटा व रंगपध्दतीचा देखील तुम्ही उपयोग करू शकतात. तसेच रंगकामासाठी तुम्ही तुमच्या आवडीच्या रंगमाध्यामाची ही निवड करू शकतात. उदा. जलरंग (पारदर्शक / अपारदर्शक), रंगीत पेन्सिल, वॅक्स क्रेओनस, ऑइल पेस्टल, या सारख्या रंग माध्यमांचा स्वतंत्रपणे अथवा एकत्रित पद्धतीने वापर करता येईल. त्याच प्रमाणे विविध प्रकारच्या तंत्रांचा उपयोग करतांना पोतनिर्मितीसाठी हाताची बोटे, चुर्गळलेला कागद, झाडाची पाने, कंगवाब्लेड, मोझाईक, स्ट्रिपलिंग वापर करून चित्राचे सौंदर्य अधिक वाढवता येते. वेळोवेळी रंगकाम करातांना पाणी खराब झाल्यावर ते बदलत राहावे जेणेकरून तुमच्या रंग छटामध्ये बदल होणार नाही. ब्रश पुसण्यासाठी कापडाचा वेळोवेळी उपयोग करत राहावे.  तरी नमुना चित्राचे निरीक्षण करून बारकावे समजून घ्या त्या प्रमाणे सराव करण्याचा प्रयत्न करा. साधारण 10 चित्र रेखाटुन त्यांचे रंगकाम करून सराव करावा. पहिल्या चित्रात झालेल्या चुका पुन्हा नव्या चित्रात होणार नाहीत यांची दक्षता घ्यावी. नियमित सरावाने आपण निश्चितच a ग्रेड प्राप्त करू शकतात. 

 डिझाईन रंगकाम व त्यांचे बारकावे समजून घेण्यासाठी तसेच आपल्या उत्तम सर्वांसाठी खालील लिंक वर Click करा.  अभ्यासपूर्ण सराव हाच यशाचा राजमार्ग आहे. 













 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Elementary & Intermediate Exam | Plan Geometry | Solid Geometry | Calligraphy | कर्तव्य भूमिती | घानभूमिती | अक्षर लेखन

Object Drawing / Still Life वस्तुचित्र / स्थिरचित्र