Elementary & Intermediate Exam | Plan Geometry | Solid Geometry | Calligraphy | कर्तव्य भूमिती | घानभूमिती | अक्षर लेखन
Elementary & Intermediate Exam | Plan Geometry | Solid Geometry | Calligraphy
कर्तव्य भूमिती | घानभूमिती | अक्षर लेखन
परीक्षेच्या वेळापत्रकानुसार हा चौथा पपेर असतो. एलिमेंटरी परीक्षेसाठी २.३० तास तर इंटरमिजिएट परीक्षेसाठी ३.०० तास वेळ या पेपरसाठी देण्यात येतो.
एलिमेंटरी व इंटरमिजिएट परीक्षेसाठी नवीन अभ्यासक्रमानुसार भौमितिक कृत्य येथे तपशीलाने दिलेली आहेत. प्रत्येक कृती कशा प्रकारे सोडवावी व त्याचा सराव करावा यांची काही
संदर्भ चित्र दिलेली आहेत. तसेच या आकृती आपल्याला सहज रित्या समजाव्यात यासाठी संपूर्ण
भूमितीच्या व्हिडिओ लिंक ही सोबत देत आहे. संपूर्ण एक्स्पलेनेशन सह सहज सोप्या भाषेत
संपूर्ण कृत्य दिलेली आहेत. यातून आपला भूमितीचा सराव सहज आणि सुलभ होणार आहे. दोघ परीक्षांसाठी आता आवश्यक वीस कृत्यपद्धतींचा
अभ्यास क्रमात समावेश आहे. त्याच कृत्यांवर आधारलेले प्रश्न परीक्षेत विचारले जातील. भौमितिक आकृत्यांचे रेखाटन करातांना नीटनेटकेपणा व काटेकोरपणा याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. रचना, रेषा अस्पष्ट आणि कृत्याच्या आवश्यक असलेल्या रेषा ठळक कराव्यात, तसेच रचनारेषा पुसून न टाकता कायम ठेवने
आवश्यक आहे.
त्यानंतरचा पुढील भाग म्हणजे अक्षरलेखन. अक्षरलेखनामध्ये जेवढ्या भाषा तेवढे नाविन्य, सौंदर्य बघावयास मिळते. मनाचा मुक्त आविष्कार या माध्यमातून करता येतो. यामुळे अक्षर सौंदर्यदृष्टी निर्माण होऊन अक्षर सुधारते. दोन्ही परीक्षांसाठी अक्षरलेखन करणे अनिवार्य आहे. एलिमेंटरी परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी स्वताच्या आवडीनुसार बाह्य आकार घेऊन त्यांमध्ये दिलेले अक्षर, शब्द स्वताच्या आवडीनुसार किंवा शब्दार्थाला अनुसरून लेखन करायचे आहे. अक्षरांसाठी तुमच्या सृजनशीलतेचा उपयोग करून योग्य असे लेखन केले तरी चालेल. रंगवताना तुमच्या कल्पकतेने रंगकाम करावे. विषयानुरूप रंग छटा वापरण्यास हरकत नाही. सरावासाठी तीन ते सहा शब्द असलेल्या अक्षरांचा सराव करावा. ( उदा. चित्रकार, अक्षरगंध, महामानव, कलादालन, रंगभूषा, भारत, पाऊसधारा, कलावंत, चित्रकार, प्रतिबिंब, निसर्ग, कलाकार, आविष्कार, महोत्सव, वृक्षवल्ली, स्वर साधना, महाप्रसाद, महामानव, युगपुरुष )
इंटरमीजिएट परीक्षेसाठी अक्षरलेखन करताना आता प्रमाणपट्टीचा
उपयोग करण्याची आवश्यकता नाही. नवीन अभ्यासक्रमानुसार प्रश्नपत्रिकेत दिलेल्या
अंतरानुसार बनवलेल्या बाह्यआकारामध्ये दिलेला शब्द किंवा अक्षरसमुहाचे तुम्हास आवडेल त्या पद्धतीने, कल्पकतेने, शब्दास अनुसरून रेखाटन करावे. नावीन्या आणण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करावा. रंगकाम करतांनाही शब्दानुरूप रंगयोजाना केल्यास अक्षरलेखन अधिक परिणामकारक होते. बाजारातील अक्षर फलक तुम्ही बघतच असतात ते ज्याप्रमाणे नाविन्यामुळे आपले लक्ष आकर्षून घेतात त्या प्रमाणे आपले अक्षरलेखनही आकर्षक होणे गरजेचे आहे. योग्य रंगछटांचा उपयोगामुळे
तुमच्या चित्रात सौंदर्य निर्माण होते या साठी त्यांचा चांगला सराव
करावा. सरावासाठी देवनागरी, रोमन किंवा इतर कोणत्याही पद्धतीचा उपयोग करुशाकतात. अक्षरांच्या सरावासाठी राजे शिवाजी, जानताराजा, बालकला, आकाशगंगा, माझी मुंबई, स्वतंत्रता दिवस, पृथ्वी वाचवा, चिमणी वाचावा, समाजसेवा. अशा अक्षर समूहांचा सराव करू शकतात. अधिक माहितीसाठी नमूना चित्रे पहावीत.
या लेखमाला निच्चीतच सर्व परीक्षर्थीना उपयोगात येतील. नवीन अभ्यासक्रमातील संभ्रम दुरहोण्यास थोडी मदत होईल अशी आशा आहे. सर्व परीक्षेस बसलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा.. !!!

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा