Object Drawing / Still Life वस्तुचित्र / स्थिरचित्र
Object Drawing / Still Life वस्तुचित्र / स्थिरचित्र
परीक्षेच्या वेळापत्रकानुसार हा पहिला पपेर असतो. एलिमेंटरी परीक्षेसाठी २.३० तास तर इंटरमीजीएट परीक्षेसाठी ३.०० तास वेळ या पेपरसाठी देण्यात येतो.
एलिमेंटरी परीक्षेसाठी आपल्यासमोर वेगवेगळ्या आकारमानाच्या दोन मानव निर्मित वस्तू आणि एक निसर्गनिर्मित वस्तू ठेवलेले असते. उदा. बकेट, डस्टबिन, टब, पाण्याची बॉटल, मग. प्लेट, ग्लास , झाडू, कळशी इ. तसेच नैसर्गिक घटकासाठी फुल, फड, दहाडी, वांगी, टोमाटो, भोपळा, ढोबळी मिरची, दोडका, काकडी, नारड, केळी, सफरचंद, संत्री, पपई, मोसंबी, अंडी, ब्रेड, या सारखी एक नैसर्गिक वस्तू त्या वस्तू समुहात ठेवलेली असेल. कागदाच्या आकाराला शोभून दिसेल आशा मोठ्या आकारात वस्तुसमुहाचे सुसंगत व प्रमाणबद्ध रेखाटन करावयाचे असते. लहान चित्रास गुण दिले जात नाहीत. चित्र रेखाटताना यांत्रिक साधनांचा उपयोग करू नये
आशा सूचना प्रश्नपत्रिकेत दिलेल्या असतात. त्यानुसार रेखाटणाचा सराव आपण करायला हवा.
अधिक उत्तम सरावासाठी खालील लिंक ला Click करा.
प्रथमतः आपल्या समोरील वस्तुसमुहाचे हलक्या हाताने प्रमाणबद्ध ( लाईट ) रेखाटन करावे. कॉम्पोझिशन निश्चित झाल्यावर वस्तूवरील छायाप्रकाशाची मांडणी करून घ्यावी. ज्यात लाईट कोणत्या दिशेने असेल, गडद छटा कोणत्या दिशेने किती अंतरापर्यंत असेल, मध्यम छटेची जागा निश्चिती करून घ्यावी. आशा प्रकारे वस्तुसमुहाचे हुबेहूब चित्रण करून योग्य रंगात रंगकाम करावे. रंगकामासाठी आवडीच्या रंगमाध्यमाचा उपयोग तुम्ही करू शकता. उदा. जलरंग ( पारदर्शक / अपारदर्शक ) रंगीत पेन्सिल, वक्स क्रेओनस, ऑइल पेस्टल, या सारख्या रंग माध्यामांचा स्वतंत्रपणे अथवा एकत्रित पद्धतीने वापर करू शकतात. त्याच प्रमाणे विविध प्रकारच्या तंत्रांचा उपयोग करून छाया प्रकाशासह चित्र रंगवता येईल ( उदा. स्टीपलिंग, पोतानिर्मिती इ. ). वेळोवेळी रंगकाम करातांना पाणी खराब झाल्यावर ते बदलत राहावे जेणेकरून तुमच्या रंग छटामध्ये बदल होणार नाही. गडद उजड छटांचा योग्य ठिकाणी व्यवस्थित उपयोग करून चित्र पूर्ण करावे. चित्र पूर्ण झाल्यावर ग्रे रंगाने अथवा प्राथमिक रंगांच्या मिश्रणाने तयार होणाऱ्या काळपट रंगाचा उपयोग वस्तूंची सावली दाखवण्यासाठी करावा. सोबतच्या नमुना चित्राचे निरीक्षण करून बारकावे समजून घेता येतील. अधिक उत्तम परिणाम साधण्यासाठी उजड आणि गडद छटांचा सराव करणे आवश्यक आहे. चांगल्या ग्रेड ने पास होण्यासाठी १० वास्तूचित्रांचे रेखाटन आणि रंगकाम छाया भेदासह करावे.
अधिक उत्तम सरावासाठी खालील लिंक ला Click करा.- Object Drawing Coloring | Bucket Coloring for Elementary & Intermediate Exam | Coconut Coloring
- Bucket coloring step by step | Poster color painting for beginners | Bucket coloring elementary
- Coconut Drawing and coloring | Object Drawing Colouring | Elementary & Intermediate Exam | Coloring
- Bottle gourd drawing and coloring, Brinjal drawing with color, Object drawing Elementary and Int.
इंटरमिजिएट परीक्षेशाठी स्थिरचित्राचे रेखाटन करत असताना आपल्या समोर वेगवेगळ्या आकाराच्या चार ते पाच मानवनिर्मित व निसर्गनिर्मित वस्तूंची मांडणी केलेली असेल. समूहाच्या मागील बाजूस व खालील बाजूस वस्तू
समूहास शोभेल असे रंगीत कापड ( ड्रेपरी ) असते. या वस्तुसमुहाचे तुलनात्मक रेखाटन या स्थिर चित्रात करावे लागते. वस्तूची योग्य सुसंगत माडणी, परस्परातील प्रमाण, छायाभेद, पोतनिर्मिती व सर्जनशीलता आपल्या कामात दिसावयास हवी. चित्र रेखाटतांना यांत्रिका साधनांचा वापर करूनये
अशी सूचना प्रश्नपत्रिकेत दिलेली असते. लहान आकाराच्या चित्रांना गुण दिले
जात नाहीत याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. रंगकाम स्वतंत्र किवा मिश्र पद्धतीने करण्याचे स्वातंत्र्य विद्यार्थ्याना दिलेले असते. प्रथमतः आपल्या समोरील वस्तुसमुहाचे उजळ (लाईट) रेषांमध्ये रेखाटन करावे. कॉम्पोझिशन निश्चित झाल्यावर वस्तूवरील छायाप्रकाशाचे निरीक्षण करून हुबेहूब चित्रण
करावे. त्यानंतर
योग्य रंगात रंगविण्यास सुरवात करावी. नंतर मागील कापड आणि खालील कापड (ड्रेपरी) यांच्या रंगकामास सुरुवात करावी. कापडावरील घड्या छायाप्रकाशासह दाखवण्याचा प्रयत्न करावा. रंगकामासाठी आवडीच्या रंगमाध्यमाचा उपयोग तुम्ही करू शकता. उदा. जलरंग ( पारदर्शक / अपारदर्शक ), रंगीत पेन्सिल, वक्स क्रेओनस, ऑइल पेस्टल, या सारख्या रंग माध्यमांचा स्वतंत्रपणे अथवा एकत्रित पद्धतीने वापर करू शकतात. त्याच प्रमाणे विविध प्रकारच्या तंत्रांचा उपयोग करून छाया प्रकाशासह चित्र रंगवता येईल ( उदा. स्टीपलिंग, पोतनिर्मिती इ. ). कामाचा दर्जा हा एलिमेंटरी परीक्षे पेक्षा जास्त परिणामकारक, सुयोग्य रंगात योग्य छाया प्रकाशासह अपेक्षित आहे. वेळोवेळी रंगकाम करातांना पाणी खराब झाल्यावर ते बदलत राहावे जेणेकरून तुमच्या रंग छटामध्ये बदल होणार नाही. यासाठी आपण दोन बाऊलचाही उपयोग करू शकता. एक
स्वच्छ पाण्यासाठी जे रंगांमध्ये मिक्स करण्याच्या कामी येईल. आणि दुसरे जे ब्रश
धुण्याच्या कामी येऊ शकेल. तसेच ब्रश पुसण्यासाठी कापडाचा उपयोग करावा. अशा प्रकारे चित्र पूर्ण करावे. सोबत दिलेल्या नमुना चित्राचे निरीक्षण करून बारकावे समजून घेता येतील.
- Still, life drawing, Easy, and simple still life drawing, How to draw still life, Object, स्थिरचित्र
.jpeg)








टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा