Elementary and Intermediate Drawing Exam / शासकीय रेखाकला एलिमेंटरी व इंटरमिजिएट चित्रकला ग्रेड परीक्षा.
Elementary and Intermediate Drawing Exam Org. by Govt. of Maharashtra
शासकीय रेखाकला एलिमेंटरी व इंटरमिजिएट चित्रकला ग्रेड परीक्षा
मार्गदर्शक लेख मालिका लाखो विद्यार्थ्यांसाठी / परीक्षार्थीसाठी...
विनोद शेलकर यांच्या २३ वर्षांच्या अनुभावतून साकारलेली...
चार विषयांचे चार लेख संदर्भ चित्रांसह...
१९६५ पासून महाराष्ट्र राज्याच्या कालासंचालानाल्यातर्फे एलिमेंटरी व इंटरमिजिएट या चित्रकला ग्रेड परीक्षा घेतल्या जातात. या परीक्षा महाराष्ट्रराज्याबरोबर गोवा, राजस्थान, उत्तरप्रदेश अशा अनेक राज्यात देखील घेण्यात येतात. प्रत्येक वर्षी लाखो विद्यार्थी ही परीक्षा देत असतात. विद्यार्थांमध्ये कलेची आवड निर्माण करून सौन्दार्यादृष्टीकोन विकसित करणे, सृजनशीलतेचा विकास करणे, भारतीय कलासंस्कृती व कला परंपरांची जोपासना करणे. पर्यावरण संवर्धन, सामाजिक, सांस्कृतिक विषय घेऊन जनजागृती करणे तसेच त्याच्या संवर्धनासाठी भावनिक नाते निर्माण करणे. त्याच बरोबर वर्तमानकालीन शैक्षणिक दृष्टीकोन व त्यातील कला शिक्षणाचे महत्व अधोरीखीत करून विद्यार्थ्यांमध्ये मध्ये कलेची आवड निर्माण व्हावी या उद्देशाने या परीक्षेच्या आभ्यासक्रमाची पुनर्रचना करण्यात आली.
रेखाकलपरीक्षेमध्ये इयत्ता सातवी ते बारावीपर्यंतचे शालेय विद्यार्थी परीक्षेस बसतात. महाविद्यालीन किंवा खाजगी विद्यार्थी बाहेरून या परीक्षांना बसू शकतात. चित्रकला विषयातील उच्च अभ्यासक्रमात प्रवेश मिळवण्यासाठी ही परीक्षा आवश्यक समजली जाते. या परीक्षेची उपुक्तता केवळ कलाशिक्षानापुरतीच मर्यादित नसून बदलत्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात सृजनात्मक निर्मितीसाठी कलाशिक्षण उपुक्त ठरते. यातून विद्यार्थ्यानमध्ये कौशल्य आणि नीटनेटकेपणा निर्माण होतो. तांत्रिक, अभियांत्रिकी, वैद्यकीय अभ्यासक्रम, अंतर्गत गृहसजावट, एनिमेशन, ड्रेस डिझायनर, ड्राफ्टमन, सर्व्हेअर,पयोजित कलाअभ्यासक्रम तसेच ए.टी.डी. ( कलाशिक्षक अभ्यासक्रम ) यासारख्या क्षेत्रात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या अध्यापक विद्यालयातील विद्यार्थ्यांना रेखाकला परीक्षा अत्यंत उपयुक्त ठरतात. त्याचप्रमाणे इतर अनेक अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेताना प्राधान्य ही दिले जाते.
यासोबतच १० वी एस. एस. सी. बोर्डाच्या परीक्षेत या दोघ परीक्षा पास असणाऱ्या विद्यार्थ्यास त्यांनी प्राप्त केलेल्या ग्रेड नुसार अतिरिक्त गुण दिले जातात. ज्यात इंटरमिजिएट परीक्षेत ‘अ’ श्रेणीसाठी ७ गुण, ‘ब’ श्रेणीसाठी ५ गुण, तर ‘क’ श्रेणीसाठी ३ गुण दिले जाततात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आता पर्यंत जोपासलेल्या कलेचा, अतिरिक्त केलेल्या मेहनतीचा त्यांना फायदा होतो.
जुलै आणि ऑगस्ट महिन्यात या परीक्षांचे फॉर्म ऑनलाइन पद्धतीने भरण्यात येतात. शाळेचे विद्यार्थी आपल्या शाळेमार्फत तर बहिस्त विद्यार्थी परीक्षा केंद्रमार्फत आपला फॉर्म भरू शकतात. कोणता ही विद्यार्थी, परीक्षा देऊ इच्छित असलेला व्यक्ति या परीक्षेपासून वंचित राहणार नाही यांची दक्षता घेतली जाते. प्रत्येक वर्षी या परीक्षा सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात घेण्यात येतात. यावर्षी ही परीक्षा २५ सप्टेंबर
पासून सुरू होत आहेत. या परीक्षांसाठी बसणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांना या लेखांचा निश्चितच फायदा होईल.
ऑनलाइन फॉर्म भरण्यासाठी शासनाच्या नवीन वेबसाइटची लिंक ( फक्त केंद्र आणि कलाशिक्षकांसाठी) - http://www.msbae.org.in
प्रथम आपण नवीन अभ्यासक्रमातील नवीन विषयांसंदर्भात माहिती घेऊया. नवीन अभ्यासक्रमानुसार आता एलिमेंटरी परीक्षेसाठी १) वस्तूचित्र २) स्मरणचित्र ३) संकल्पचित्र - नक्षीकाम ४) कर्तव्य भूमिती व अक्षरलेखन असे चार विषय आहेत. त्याचप्रमाणे इंटरमिजिएट परीक्षेसाठी १) स्थिरचित्र २) स्मरणचित्र ३) संकल्पचित्र ( नक्षीकाम ) ४) कर्तव्य भूमिती, घनभूमिती व अक्षरलेखन असे चार विषय आहेत. तरी विषय निहाय सविस्तर माहिती संदर्भित चित्रांसह आपण लेखांमध्ये पहाणार आहोत. लेखांमध्ये दिलेल्या माहितीच्या आधारे आपण सातत्य पूर्ण सराव केल्यास निश्चितच त्याचा आपणास फायदा होईल यांची मला खात्री आहे.
प्रत्येक वर्षी परीक्षेचे वेळापत्रक आणि पेपर पूर्ण करण्यासाठी देण्यात येणारा कालावधी सारखाच असतो. फक्त परीक्षेच्या तारखेत थोड्याफार प्रमाणात बदल होतो.
विनोद लक्ष्मण शेलकर हे गुरूनानक इंग्लिश हायस्कूल आणि ज्यू कॉलेज ऑफ कॉमर्स कल्याण (पश्चिम) येथे कला शिक्षक आहेत. ते २००१ पासून या शासकीय रेखाकला परीक्षांचे परीक्षक म्हणून काम पहात आहेत. आणि आता सात वर्षांपासून मोडरेटर म्हणून काम पहात आहेत. त्यांच्या या २३ वर्षांच्या प्रदीर्घ अनुभवाचा महाराष्ट्रातील सर्व परिक्षेस बसलेल्या लाखों विद्यार्थ्यांना उपयोग व्हावा यासाठी ही खास लेखमाला आपल्यासाठी.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा