एलिमेंटरी व इंटरमिजिएट परीक्षेत साहित्याचा उपयोग कसा करावा ?


एलिमेंटरी  इंटरमिजिएट परीक्षेत साहित्याचा उपयोग कसा करावा ?  

(काळजीपूर्वक वाचा आणि लक्षात ठेवा)

1. चित्र रेखाटत असतांना शक्यतो इरेजर वापरणे टाळा अथवा कमीत कमी करा.

2. रंगकाम करतांना दोन वाट्या  पाणी तयार ठेवा (एक ब्रश साफ करण्यासाठी आणि दुसरा रंग कामासाठी).

3. रंगीत पॅलेटचा उपयोग न करता मोठ्या आकाराचे पांढरे पॅलेट वापरा किंवा पांढऱ्या बाशीचाही ऊययोग करू शकतात.

4. फक्त एक ब्रश वापरून संपूर्ण चित्र रंगवू नये; लहान भाग रंगविण्यासाठी आणि चित्राची रूपरेषा काढण्यासाठी लहान टोकदार ब्रश वापरा आणि मोठे भाग रंगविण्यासाठी मोठ्या आकाराचा / नंबरचा ब्रश वापरा.

5. रंगकाम करतांना साहित्य ठेवतांना काळजी घ्यावी. पाण्याचे भांडे तुमच्या उजव्या बाजूला (किंवा तुम्ही डाव्या हाताचे असल्यास डावीकडे) ठेवावे. उदा. रंग, पॅलेट, ब्रशेस इ. 

6. तुमचे रंग काम पूर्ण केल्यानंतर, तुमचे ब्रश कापडाने पुसून स्वच्छ आणि सरळ करा. वापरल्यानंतर तुमचे पॅलेट पूर्णपणे स्वच्छ करा. ब्रशेसपेक्षा मोठ्या बॉक्समध्ये ब्रशेस व्यवस्थित ठेवा.

7. जेव्हा तुम्हाला विशिष्ट रंगाची दोन किंवा अधिक रंग मिसळून नवीन रंगाची छटा तयार करायची असेल, तेव्हा ते आवश्यकतेपेक्षा थोडे जास्त प्रमाणात तयार करा कारण,  काम करतांना  अपुरी पडली तर तीच गडद अथवा उजळ छटा पुन्हा तयार करणे कठीण असते. 

8.  ब्रश रंगाच्या बाटलीत बुडवण्यापूर्वी स्वच्छ करा. अन्यथा, ब्रशवरील रंग बाटलीतील रंग खराब करतील.

9. एका बाटलीची टोपी दुसऱ्या बाटलीवर लावू नका.

10. रंग सुकायला लागल्यास, रंगाच्या बाटलीत 4-5 थेंब स्वच्छ पाण्याचे टाका, जेणेकरून आतील रंग कोरडे होणार नाहीत .

साहित्याच्या अधिक माहितीसाठी हा विडियो पहा.

Drawing materials for elementary and intermediate drawing grade exam | materials for beginners

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Design संकल्पचित्र – नक्षीकाम

Elementary & Intermediate Exam | Plan Geometry | Solid Geometry | Calligraphy | कर्तव्य भूमिती | घानभूमिती | अक्षर लेखन

Object Drawing / Still Life वस्तुचित्र / स्थिरचित्र