Human Face Drawing and Colouring
Human Face Drawing and Colouring
How to draw a human face? विविध मानवी चेहरे कसे बनवावे ?
Human Figure ( मानवाकृती) रेखाटने हे विद्यार्थ्यांसाठी सर्वात कठीण वाटणारा विषय. यामध्ये व्यक्तिचित्रण करावे लागते आणि सुयोग्य आकारमानात मध्ये व्यक्तीचित्र रेखाटणे हे विद्यार्थी दृष्टीने थोडे अवघड जाते. परंतु सरावाने आपल्याला व्यक्तिचित्र रेखाटने शिकता येते. Human Figure रेखाटत असतांना, त्याचा सराव करतांना सर्वप्रथम Human body Parts यांचा सराव करणे गरजेचे असते. ज्यात चेहरा Face, हात Hand, पाय Legs यांचा सराव महत्त्वाचा ठरतो. हा सराव आपण चांगल्या पद्धतीने केल्यास Human figures जास्त परिणामकारक पद्धतीने बनवण्यास व शिकण्यास सोपे जाते.
विविध चेहरे रेखाटन Step by Step पहाण्यासाठी खालील लिंक वर Click करा.
Human face drawing tutorial for beginners | Face drawing step by step | Face drawing easy
व्यक्ती तितके चेहरे हे आपण पाहतो. तसेच आपल्या सभोवती वेगवेगळ्या जाती, धर्माची लोक राहतात. प्रत्येकाचा पेहराव हा वेगळा असतो. त्यामुळे अशा विविध पेहरावाची व त्यांच्या राहण्याच्या पद्धतीची विविध चेहरे आपण शिकायला हवे. मेमरी ड्रॉईंग बनवत असतांना किंवा इतरही रेखाटन करत असतांना आपल्या चित्रांमध्ये विविधता आणण्यास या वेगवेगळ्या चेहऱ्यांच्या सरावाची आपणास मदत होईल.
तसेच ज्याप्रमाणे व्यक्तींच्या राहाणीमानामध्ये वेगळेपणा आहे. तसाच व्यक्तींच्या रंगांमध्ये सुद्धा विविधता आपल्याला दिसून येते. त्यामुळे काही व्यक्ती गोऱ्या, सावळ्या किंवा कृष्ण वर्णी दिसून येतात... अशाच पद्धतीने जर आपण रंग विविधता सुद्धा आपल्या चित्रामधून दाखवता आली तर अभ्यासपूर्ण पद्धतीने रेखाटन व रंगकाम आपण करू शकतो.
आज आपण ह्युमन फेस कशा पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारे आपण बनवू व रंगवू शकतो हे पाहूया.
विविध चेहरे रंगकाम Step by Step पहाण्यासाठी खालील लिंक वर Click करा.
How to colour human face with watercolor | Human face painting | Human face colouring | Face colour


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा