Memory Drawing स्मरणचित्र

Memory Drawing   स्मरणचित्र

परीक्षेच्या वेळापत्रकानुसार हा दुसरा पपेर असतो. एलिमेंटरी    इंटरमीजीएट परीक्षेसाठी .०० तासाचा कालावधी या पेपरसाठी देण्यात येतो.

          स्मरणचित्र हा  विषय विद्यार्थ्यांनी दिलेल्या विषयानुसार आपल्या कल्पना शक्तीने काढायचा असतो. प्रथम चित्र रेखाटतांना लाईट रेषेमध्ये रेखाटन करावे. जेणेकरून अनावश्यक  भाग सहज रबच्या साह्याने सहज मिटवता येतो. आपल्याला परिचित प्रसंगावर अथवा प्रश्नपत्रिकेत दिलेल्या विषयावर, विषयास अनुसरून प्रसंग रेखाटून त्यास अनुरूप असा मागील पार्श्वभाग दाखवणे अपेक्षित असते. एलिमेंटरी परीक्षेसाठी तीन ते चार मानवाकृती इंटरमीजीएट परीक्षेसाठी चार किंवा त्यापेक्षा जास्त मानवाकृती काढून मूळ प्रसंगाला महत्व देत रेखाटन करावे. चित्राची रचना ही स्वनिर्मित, कल्पक उस्फुर्त आविष्कार, शीघ्र रेखाटन दर्शवणारी असल्यास तिला प्राधान्य दिले जाते. विषयानुसार चित्रातील हालचाली, स्थिती आशय अतिशय महत्वाचा असतो. जास्त तपशीलवार रेखाटन करण्यापेक्षा कल्पकता, रचना  निरीक्षण याकडे लक्ष द्यावे.

          या चित्रांसाठी कौटुबिक प्रसंग, शाळा, वर्ग, मैदानावरील खेळ, प्रसंग, दैनंदिन प्रसंग, घटना, राष्ट्रीय, सन, उत्सव, समारंभ, मिरवणुका, दिंडी, यात्रा, गर्दीची ठिकाणे, पर्यावरण, कल्पना आविष्कार, अशा प्रकारच्या विषयांचा समावेश असतो. त्यामुळे वातावरण निर्मितीसाठी विषयास अनुसरून पार्शोभूमी, सूचक घटकांचा समावेश करणे अपेक्षित असते. या सोबतच प्रसंगात अधिक जीवंत पणा आणण्यासाठी लहान मुले, आजी आजोबा, प्राणी, पक्षी, विविध झाडे, वेली, गवत, दगड, विषयानुरूप सजावट यांचा कल्पक पद्धतीने ऊपयोग करता येतो. तसेच चित्रात अंतराचा भास निर्माण करण्यासाठी यथार्थ दर्शन शास्र ( Perspective)  चा उपयोग करता येतो. लहान चित्रास गुण दिले जात नाहीत यासाठी चित्र रेखाटतान सुयोग्य आकारात रेखाटन कारवे. मानवाकृतींचा अधिक सराव होण्यासाठी दररोज नियमित मानवाकृती रेखाटणाचा सराव करावा.   



           चित्र रंगवतांना जलरंग, (पारदर्शक किंवा अपारदर्शक ) रंगीत पेन्सिल, ऑईल पेस्टल, अशा रंगमाध्यमांचा स्वतंत्रपणे किंवा एकत्रित पणे तुम्ही उपयोग करू शकता. चित्रात नाविन्य आनण्यासाठी योग्य रंगांचा प्रसंगानुरूप उपयोग करून चित्राचे सौदर्य अधिक परिणाम कारक करता येते. चित्रात गडद, उजड छटांचा उपयोग करून अधिक आकर्षकता निर्माण करता येते. चित्र संपूर्णपणे रंगवणे आवश्यक असते. स्वकल्पनेने काढलेल्या चित्रास प्राधान्य दिले जाते. अशा प्रकारे स्मरणचित्र हा दुसरा पेपर आपण सोडवल्यास आपणास घवघवीत यश निश्चित मिळेल. अधिक माहितीसाठी सोबत काही नमुना चित्र दिलीआहेत त्यांचा अभ्यास करावा.

 


            स्मरणचित्र विषय विद्यार्थ्यांना थोडा कठीण जात असल्याने त्यासाठी वेळेचे नियोजन करणे गरजेचे आहे.

वेळेच्या नियोजनासाठी काही महत्वाच्या टिप्स –

१ ) ५ मिनिट विषय समजून काढावयाचा प्रसंग डोळ्यासमोर उभा करा.

२) १० मिनिट कच्चे रेखाटन, स्टिक फिगर सोबत आणि मांडणी यासाठी द्या.

३) २० मिनिटांत आता सर्व डिटेल्स रेखाटून घ्या.

४) १० मिनिटांत बॅकग्राऊंड  चे रेखाटन करून घ्या.

५) २० मिनिट आधी  बॅकग्राऊंड रंगकाम/ पेंटिंग करून घ्या.

६) ४० मिनिटांत आता मानवकृतींचे रंगकाम/ पेंटिंग करून घ्या.

७) ५ मिनिट आता चित्राला कोरडे होउद्या.

८) १० मिनिट आता चित्राला काळ्या रंगाच्या स्केच पेनने आऊटलाईन करा आणि फिनिशिंग टंच द्या.   

९) चित्रास १.५ से. मी. ची बॉर्डर लाइन सोडल्यास चित्र अधिक आकर्षक दिसते आणि ती बॉर्डर काळ्या रंगाने रंगवल्यास संपूर्ण लक्ष चित्राकडे रहाते. तसेच दिलेले रंग अधिक उठून दिसतात. 





         तसेच वेगवेगळ्या वर्षात आलेले प्रश्न पत्रिकांमधील काही विषय सरावासाठी दिले आहेत त्यांचा आपण सराव केल्यास निश्चितच उत्तम श्रेणी ( ग्रेड ) मिळवण्यास आपल्याला फायदा होईल.

एलिमेंट्रीसाठी  सराव प्रश्न 

१) शाळेच्या कार्यक्रमाप्रसंगी पाहुण्यांचे स्वागत करतानाचा प्रसंग. 

२) शाळेच्या मधल्या सुट्टीत जेवण करताना विद्यार्थिनी. 

३) विद्यार्थी / विद्यार्थिनीला बक्षीस मिळवल्याबद्दल प्रोत्साहन देणारे व अभिनंदन करणारे आई वडील. 

४) वाढदिवस साजरा करतांना मित्रपरिवार व आई-वडील. 

५) सहलीच्या ठिकाणी जेवण करताना कुटुंब. 

६) बगीच्या मध्ये खेळणारे मुले व मुली. 

७) दोन मुले व मुली शाळेतील प्रयोग शाळेत प्रयोग करतानाचा प्रसंग. 

८) गावात झाडे लावणाऱ्या ग्रामस्थांना मदत करणारी शाळेतील मुले व मुली. 

९) पार्थ, प्रिशा आणि भूमी शाळेतील कॉम्प्युटरवर गेम खेळतांनाचा प्रसंग. 

१०) मुलगा आणि मुलगी आपल्या मित्रांसाह पावसात खेळतांना.

इंटरमिजिएटसाठी सराव प्रश्न 

१) इमारत बांधकामाच्या ठिकाणी काम करणारे कारागीर.

२) गावातील ग्राम स्वच्छता अभियानात सहभागी झालेले ग्रामस्थ. 

३) सहलीच्या ठिकाणी लपाछपी खेळणारी मुले. 

४) शाळेतील वर्ग खोली सजवतांना विद्यार्थी आणि त्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक. 

५) ग्रंथ दिंडी अथवा वृक्ष दिंडी 

६) माझे आई-वडील आणि मित्रपरिवार माझा वाढदिवस साजरा करतांनाचा प्रसंग. 

७) गावातील नदी स्वच्छता अभियानात सहभागी झालेले ग्रामस्थ. 

८) लग्न समारंभ 

९) निवडणूक प्रचारसभा 

१०) एन. जी. ओ. चे प्रतिनिधी ग्रामस्थांना स्वच्छता अभियाना विषयी मार्गदर्शन करतांना. 

११) फुले विक्रेत्याकडून फुलांच्या माळा विकत घेणारे आई व दोन मुले. 

१२) पाणीपुरीच्या स्टॉलवर पाणी पुरी खाणारे फॅमिली. 

१३) आपल्या परिवारासोबत झाडे लावणारे मुले व मुली.

स्मरण चित्राच्या सर्वांसाठी खालील लिंक पहा.. Step by Step आपण सराव करा.. यश तुमच्या हातात असेल... 












ALL THE BEST FOR YOUR EXAM... 

 

    

 

 

 

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Design संकल्पचित्र – नक्षीकाम

Elementary & Intermediate Exam | Plan Geometry | Solid Geometry | Calligraphy | कर्तव्य भूमिती | घानभूमिती | अक्षर लेखन

Object Drawing / Still Life वस्तुचित्र / स्थिरचित्र